पाणी परीक्षण करणे.
उत्पादक काम:
1) पाण्यातील विविध घटक
ओळखण्यास शिकणे.
2) पाणी परीक्षण करणे.
कृती -
अ) परीक्षा बाटलीमध्ये १०
मिली. पाण्याचा नमुना घ्या.
त्यात Fe-A द्रावणाचे(Reagent Fe -A) १० थेंब टाका
त्यात Fe-B द्रावणाचे(Reagent Fe -B) चे २ थेंब टाका.
बाटलीचे झाकण बंद करून
बाटली ५ मिनिटे तशीच ठेवा यानंतर Fe-C द्रावणाचे(Reagent Fe -C) १० थेंब टाका व झाकण लावून
हळुवारपणे हलवा.
यानंतर रंगमापकामध्ये (color comparator) बाटली ठेऊन Fe रंगतक्त्यातील कोणत्या
रंगाशी आलेला रंग जुळतो आहे ते पडताळून पहा. रंगाची तुलना पुरेशा सुर्यप्रकाशातच
करावी.
तक्त्यात केशरी रंगाच्या
छटा असतात. त्यातील योग्य त्या छटेशी आलेला रंग जुळवून पहावा व योग्य ते अनुमान
लिहावे.
निरिक्षण:
अनुमान: दिलेल्या पाण्याच्या
नमुन्यात लोहाचे प्रमाण____ पीपीएम आहे.
No comments:
Post a Comment