Thursday, 1 June 2017

शेजवान स्वास





वाढणी : साधारण अर्धा कप
हा शेजवान सॉस चायनिज स्टर फ्राईड वेजिटेबल्स बरोबर सर्व्ह करावा तसेच इतर चायनिज पदार्थातही याचा वापर करता येतो.

साहित्य:
१ टिस्पून आले पेस्ट
२ टिस्पून चिरलेले लसूण
२ टेस्पून पाती कांदा
१ टेस्पून पाती कांद्याची पाती
१ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
१ टेस्पून चुरडलेल्या लाल मिरच्या
दिड टेस्पून लाल तिखट
१/३ कप टोमॅटो प्युरी
१ टेस्पून सोया सॉस
दिड टेस्पून व्हिनेगर
२ टेस्पून तेल
१ टिस्पून कॉर्न फ्लोअर
१/४ टिस्पून साखर
१/४ टिस्पून मिरपूड
चवीनुसार मिठ
शेजवान सॉस याही पद्धतीने करता येईल - Schezwan Sauce
कृती:
१) कढईत तेल गरम करावे. त्यात आले लसूण फोडणीस घालावेथोडा रंग बदलला पाती कांदाकोथिंबीर आणि चुरडलेल्या लाल मिरचीची पूड घालून मिक्स करावे. १ ते २ मिनीटे परतावे.
२) नंतर लाल तिखटटोमॅटो प्युरी,सोया सॉसव्हिनेगर घालून निट मिक्स करावे. साखरमिरपूड आणि मिठ घालावे. सर्व एकत्र ढवळून घ्यावे.
३) १ टिस्पून कॉर्न फ्लोअरमध्ये २ टेस्पून पाणी घालावे आणि मिक्स करावे. हे मिश्रण सॉसमध्ये घालावे व ढवळून मध्यम आचेवर १-२ मिनीटे उकळू द्यावे.
सॉस दाटसर झाला कि गॅसवरून उतरवावा. वरून चिरलेल्या पाती घालून मिक्स करावे.
टीप:
१) हा सॉस खुप तिखट असतो त्यामुळे वापरताना गरजेपुरताच वापरावा किंवा लाल तिखटाचे प्रमाण कमी करावे.
२) उरलेला शेजवान सॉस लहान डब्यात भरून फ्रिजमध्ये ६-७ दिवस सहज टिकतो.

No comments:

Post a Comment